MH 13News Network
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सुपर मार्केट संभाजीराव शिंदे शाळा समोर येथील त्यांच्या पुतळ्यास आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलीनी चंदेले, नगरसेवक मनोज यलगुलवार, विनोद भोसले, शंकर पाटील, तिरुपती परकीपंडला, पंडित सातपुते, अनंत म्हेत्रे, भीमाशंकर टेकाळे, दिगंबर मेटकरी, गोवर्धन सुंचू, सूर्यकांत शेरखाने, राहुल बोळकोटे, गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.