Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

याराना : ‘युवराजां’ना ‘सोमनाथां’ची साथ ; जिल्ह्यातील बिग दहीहंडी उत्सव ‘दक्षिण ‘ मध्ये..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
889
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

यंदा सोलापुरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव करण्यात येणार आहे. यात तब्बल पाच लाखाचे पहिले बक्षीस युवराज राठोड आणि सोमनाथ वैद्य यांनी जाहीर केल्याने शहरात आणि विशेष म्हणजे दक्षिण मध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दक्षिण विधानसभेत यंदा कोणाला कौल मिळणार याबाबत सर्वपक्षीय राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉट मतदार संघ बनलेल्या दक्षिण विधानसभा मतदार संघात जिल्ह्यातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव करण्याचे आयोजन सोनाई फाउंडेशन व स्वयंम शिक्षा फाउंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने केले आहे.



सोनाई फाउंडेशनचे प्रमुख युवराज राठोड आणि स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे प्रमुख सोमनाथ वैद्य यांनी भाजपातील आपापले गॉडफादर यांच्या भेटी घेऊन ”ग्राउंड” तयार करण्याचे काम जोमात सुरू केले आहे.

दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने हजारो गोविंदांसोबत थेट भेट आणि संपर्क युवराज राठोड आणि सोमनाथ वैद्य यांना होणार आहे. मुंबई आणि ठाण्यामधून दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून अनेक नेतेमंडळी उदयास आली. सध्या राजकारणात अशा दहीहंडीचे काही आयोजक आमदार, खासदार असून थेट मंत्री आहेत.

येत्या गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंड या ठिकाणी या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ,मुंबई, बारामती, पुणे येथील संघांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

भाजपचे हे नेते राहणार उपस्थित..



या दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पालकमंत्री, उत्तर विधानसभेचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख व आमदार राम सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सचिन कल्याणशेट्टी, फडणवीस यांच्या मर्जीतील विश्वासू नेते माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे व धनश्री काडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

Tags: दक्षिण विधानसभा मतदारसंघदहीहंडी उत्सवपाच लाखांचे बक्षीसयुवराज राठोडसोमनाथ वैद्य
Previous Post

Bale: अंबिकानगर येथील शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रूपये खात्यावर जमा, मला लय भारी वाटतंय!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रूपये खात्यावर जमा, मला लय भारी वाटतंय!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रूपये खात्यावर जमा, मला लय भारी वाटतंय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.