Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात भव्य सायकल रॅलीचे आयोजन; रॅलीत सहभागी होण्यासाठी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यात भव्य सायकल रॅलीचे आयोजन; रॅलीत सहभागी होण्यासाठी त्वरीत नोंदणी करण्याचे आवाहन
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई – : ‘उत्सव निवडणूकीचा, अभिमान देशाचा’ या राष्ट्रीय महोत्सवात आपण सर्वांनी 20 मे 2024 रोजी मतदान करण्यासाठी उर्त्स्फुतपणे सहभागी होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन यंत्रणेमार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई उपनगर जिल्ह्याधिकारी कार्यालय, चेतना कॉलेज जवळ  सकाळी 6.30 वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सायकल ग्रुप तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 26-मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या या महोत्सवात अधिकाधिक मतदारांनी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडावे म्हणून तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय व ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही सायकल रॅली काढण्यात येणार आहे. बीवायसीएस, मुंबई व मुलुंड रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने ही सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.

असा असेल रॅलीचा मार्ग

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथून सायकल रॅलीला सुरुवात होईल. त्यानंतर ही रॅली मार्ग क्रमांक पहिला बोरीवली येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, मार्ग क्रमांक दुसरा अंधेरी क्रीडा संकुल, मार्ग क्रमांक तीसरा एनसीपीए, दक्षिण मुंबई आणि मार्ग क्रमांक चौथा मुलुंडचे कालिदास नाट्यमंदिर या चार ठिकाणी रॅली मार्गक्रमण करणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने https://torms.gle/nN9Rpi8jQY5xtspb7 गुगल फॉर्म भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विश्वनाथ अय्यर (मोबाईल क्रमांक 9619444027), कमल गाडा (मोबाईल 9821025381) यांच्याशी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे संपर्क साधावा, असेही  सहायक आयुक्त श्री. खैरनार यांनी  कळविले आहे.

या रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर व अन्य प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा दाखवून केली जाईल. या रॅलीमध्ये मुंबई शहरच्या अपर जिल्हाधिकारी फरोग मुकादम, बृहन्मुंबई महानगरपालिका उपयुक्त विश्वास मोटे, प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई इत्यादी सहभागी होणार आहेत.

Previous Post

२८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

Next Post

चौथा टप्पा : उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
चौथा टप्पा : उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

चौथा टप्पा : उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.