Tuesday, April 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

रात्रीची कामगिरी | त्या कारमध्ये निघाला लाखो रुपयांचा गांजा..!

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, राजकीय
0
रात्रीची कामगिरी | त्या कारमध्ये निघाला लाखो रुपयांचा गांजा..!
0
SHARES
18
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मंगळवारी रात्री सोलापूर शहर पोलिसांनी रात्रीच्या ड्युटी वेळी वाहन तपासणी दरम्यान मोठी कामगिरी बजावली असून लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

दिनांक 4 मार्च रोजी रात्री 11.15 वा वेळी शहर वाहतुक शाखा सोलापूर शहर कडील पोहेकों प्रकाश निकम व पोकॉ भालेराव यांच्या कडे रात्र डयुटी होती. त्या अनुषंगाने ते वाहन तपासणी करत असताना सोलापूर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेल जवळ, विजापूर बायपास ओव्हर ब्रिजचे सव्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्र.MH 47 AN 8917 यास चेक करत असताना त्याचा चालक हा कागदपत्र दाखवितो असा बहाणा करून फोनवरुन बोलत दूर जावून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला.

मात्र, सदर वाहनाचा संशय या दोघांना आला. त्यांनी गाडीची पाहणी केली. तेव्हा वाहनाचे डिक्कीमध्ये गांजा दिसून आल्याने त्यांनी तात्काळ फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांना संपर्क करुन घटनेची माहीती दिली.

माहिती मिळताच पोलीस अधिकारी अरविंद माने यांनी वरिष्ठांना माहीती दिली, तसेच पोलिस निरिक्षक तानाजी दराडे यांना कारवाई करण्याची सूचना केली.

त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करुन पो स्टे फौजदार चावडी, सोलापूर शहर येथे वाहन कार क्र.MH 47 AN 8917 चा चालक याच्याविरुध्द गुन्हा रजि क्र. 118/2025 NDPS Act कलम 8(C), 20 (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईमध्ये एकूण 48 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे 8,64000 रुपये असल्याचे आढळून आले.

तसेच वाहन कार क्र.MH 47 AN 8917 ज्याची अंदाजे किंमत 600000 रु असा एकूण 14 लाख 64हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गांजा हा कोठून आणला व कोठे घेवून जात होता? सदर गाडी कोणाची आहे? याबाबतचा तपास चालू आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) श्री विजय कबाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, विभाग 1, श्री प्रताप पोमण यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोनि तानाजी दराडे, सपोनि शंकर धायगुडे, सपोनि रोहन खंडागळे, पोह 1232 प्रविण चुंगे, पोकॉ 1456 कृष्णा बडुरे, पोकों 1617 दत्तात्रय कोळवले, पोकों 1612 नितीन जाधव यांनी कामगिरी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री तानाजी दराडे हे करीत आहेत.

Previous Post

देश आणि समाजाच्या विकासात योगदान द्या

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदार देशमुखांनी घेतली भेट

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदार देशमुखांनी घेतली भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदार देशमुखांनी घेतली भेट

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.