MH 13 NEWS NETWORK
जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाबाबत दिले निवेदन
माजी मंत्री तथा आमदार विजय देशमुख, माजी मंत्री बसवराजपाटील व आमदार श्री अभिमन्यू पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशन दरम्यान बुधवारी
भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान “महायुती सरकारने लिंगायत समाजाच्या कल्याणासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे ,पण हे महामंडळ इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत स्थापन करण्यात आल्याने याचा लाभ लिंगायत समाजातील केवळ इतर मागास प्रवर्गातील पोटजातींना होत असून जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता देण्यात यावी.
तसेच सुधारित शासकीय आदेश निर्गमित करून वीरशैव लिंगायत सोबतच लिंगायत व हिंदू लिंगायत या शब्दांचा समावेश करण्यात यावा” अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे करण्यात आली.
या आहेत मुख्य मागण्या..
महामंडळासाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करण्यात यावी,
महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या कर्जाची उच्चतम मर्यादा मर्यादा 10 लक्ष रु. वरून वाढवून 25 लक्ष रु. करण्यात यावी,
महामंडळाअंतर्गत जिल्हा स्तरावर अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात
तसेच महामंडळामार्फत प्राप्त कर्ज प्रकरणे मंजूर करणेबाबत सर्व बँकांना उचित निर्देश देण्यात यावेत
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत प्रस्ताव तपासून सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
अशी माहिती आमदार देशमुख यांनी दिली.