MH 13 News Network
मंगळवेढा तालुक्यातील शिवप्रेमी चौक येथील कार्यालयात मराठा शांतता रॅली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निकराने लढा देणे हा मराठ्यांचा स्थायीभाव असून जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मराठा जागृती शांतता रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मंगळवेढा शहर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित राहतील असा निर्धार करण्यात आला.

यावेळी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी
बबनराव अवताडे,पुरुषोत्तम बरडे,माऊली पवार, प्रा.गणेश देशमुख,शिवाजी चापले,सदाशिव पवार,विनोद भोसले,सचिन गुंड, ॲड. श्रीरंग लाळे,सचिन पवार यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेश पवार,सदाशिव पवार, प्रा.गणेश देशमुख, माऊली पवार
यांनी समयोचीत भाषणे केली.


शिक्षण मिळाले नसल्याने मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. राजकीय पक्षांनी समाजाचा वापर करून मते मिळवली परंतु समाजाला कोणताही न्याय मिळाला नाही. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माऊली पवार, मराठा समन्वयक यांनी उपस्थित समाज बांधवांना केले.
प्रा. गणेश देशमुख यांनी सोलापुरातील शांतता रॅली संदर्भात होणारे नियोजनाची माहिती दिली. सदाशिव पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत विचार व्यक्त केले. ॲड. श्रीरंग लाळे यांनी आपल्या आक्रमक आणि अभ्यासू शैलीत समाज बांधवांमध्ये आरक्षण आंदोलनाबाबत जागृती केली.महेश पवार यांनी गावा गावात जाऊन सात ऑगस्टच्या रॅली बाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.








