MH 13News Network
पुणे येथे कॉग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत महादेव कोगनुरे यांनी दिला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा.
अत्यंत अपुलकीने सुशीलकुमार शिंदे यांनी स्वीकारला महादेव कोगनुरे यांचा सन्मान.
—–
पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकूण जागा वाटपावरून बुधवार दि 4 ऑगस्ट 2024 रोजी काॅग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा यथोचित सन्मान करीत जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांनीही महादेव कोगनुरे यांचा तितकाच सन्मानपूर्वक मानसन्मान स्वीकारत आदराने विचारपूस केली.यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,खासदार प्रणिती शिंदे आदी काॅग्रेस चे वरीष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
सध्या सोलापूर जिल्ह्यात देखील विधानसभा उमेदवारी निश्चित करीता सध्या गाठीभेटीला जोर आला आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष काँग्रेस पक्षाच्या उमेदवरी निश्चितीकडे लागून राहिले आहे.