Sunday, April 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पद यात्रेस प्रतिसाद

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पद यात्रेस प्रतिसाद
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना थारा देऊ नका

मुस्लिम, मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध

काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांची ग्वाही

सोलापूर : जाती-धर्माच्या नावाखाली द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना कदापिथारा देऊ नका मुस्लिम आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या सर्वांनी पाठीशी राहावे. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन काँग्रेसच्या खा. प्रणिती शिंदे यांनी येथे केले.


सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ आज भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याप्रसंगी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी,
तोफीक हत्तुरे, विनोद भोसले, शकील मोलवी, रुस्तुम कंम्पली, असिफ तिमापुरे ,मेनोदिन शेख, नजीब शेख आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
बेगम पेठ मटण मार्केट येथून या वाजत गाजत पदयात्रेस सुरुवात झाली. त्यानंतर पुढेही पदयात्रा प्रभाग 14 मधील विविध भागातून काढण्यात आली. विजापूर बेस, बाराइमाम चौक , पेंटर चौक , किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल मार्गे बेगम पेठ मटण मार्केट येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. गळ्यात काँग्रेसचे शेले घालून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रणिती ताई तूम आगे बढो – हम तुम्हारे साथ है , चेतन भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. काँग्रेसचे नरोटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा विश्वास यावेळी महिला व मतदारांनी दिला. या पदयात्रेच्या समारोप सभेने झाला. या सभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या कारभारावर तोफ डागली.मुस्लिम, मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे सांगितले.

धर्मनिरपेक्ष काँग्रेसला खंबीर
साथ द्या : खा. प्रणिती शिंदे

सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी काँग्रेसने सदैव कार्य केले आहे. तर दुसरीकडे जाती धर्माच्या नावाखाली काही पक्ष द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भडकाऊ भाषणे देऊन संवेदनशील वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान करण्यात आला. मात्र लोकांनी संयम राखत अशा द्वेष निर्माण करणाऱ्या लोकांच्या भूलथापांना बळी पडले नाहीत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. यंदाही विधानसभेच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेसला साथ द्या. काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले.

Previous Post

जनता जशी डोक्यात घेते तशी खाली देखील आणते..! महेश कोठे यांचा देशमुखांवर हल्लाबोल

Next Post

सुविधांपासून वंचित ठेवलेल्यांना’खड्या’सारखे बाजूला काढा पदयात्रेत काडादींनी दिली हाक

Related Posts

आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
Next Post
सुविधांपासून वंचित ठेवलेल्यांना’खड्या’सारखे बाजूला काढा पदयात्रेत काडादींनी दिली हाक

सुविधांपासून वंचित ठेवलेल्यांना'खड्या'सारखे बाजूला काढा पदयात्रेत काडादींनी दिली हाक

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.