MH 13News Network
शिवगर्जना महानाट्यचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहास सादरीकरणातून शिवप्रेमी नागरिकांच्या अंगावर शहारे निर्माण केले..
जिल्ह्यात शिवगर्जना महानाट्याचे 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात आयोजन, शिवगर्जना हे एकच नाटक असून आज पासून शुभारंभ, 250 कलाकारांचा सहभाग
महानाट्याची वेळ सायंकाळी 7 ते रात्री 10 प्रवेश विनामूल्य
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जात आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर येथे शिवगर्जना महानाट्यचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल तेली -उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, महानाट्य दिग्दर्शक स्वप्निल यादव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शिवगर्जना महानाट्य सादर झालं आहे. जवळपास अडीचशे कलाकार यात सहभागी होत असून, घोडे, उंट व हत्ती हे प्राणी यात आहेत. यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी पुढील दोन दिवस या महानाट्यचा लाभ घ्यावा असे आवाहनही आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महानाट्य आयोजनाचा उद्देश सांगून हे महानाट्य पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे. यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही केल्याची माहिती दिली. यावेळी आमदार देशमुख व जिल्हाधिकारी आशीर्वाद व मान्यवर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व शस्त्रांचे पूजन करून महानाट्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हत्ती व अश्व पूजन ही करण्यात आले.
शाहीराने पोवाडा सादर करून 12 व्या शतकातील देवगिरी साम्राज्यावर खिलजी यांनी केलेल्या आक्रमणाची माहिती दिली. तसेच त्या काळातील मराठी मुलखावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराची माहिती दिली. खिलजीने देवगिरीचे यादव यांचे साम्राज्य कसे नष्ट केले. यादव व खिलजी यांच्यातील युद्ध प्रसंगातून दाखवण्यात आले.
त्यानंतर दख्खन मधील सर्व मुस्लिम सुलतानांनी एकत्रित येऊन राजा हरिहर बुक्क या हिंदु राजाचे साम्राज्य नष्ट केले. महाराष्ट्रातील धार्मिक वातावरण, मराठे सरदार सुलतानासाठी तलवार गाजवत होते,
त्यानंतर शहाजी राजे भोसले यांच कार्य, जिजाऊ माँ साहेब यांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्फुल्लिंग जागृत केले, शिव जन्म, शिव बालपण, युद्ध कला, सवंगड्यासोबत रोहिदेश्वर समोर स्वराज्य स्थापन करण्याची शपथ, पाटील याला दंड, जावळीचे मोरे यांच्याशी युद्ध, अफजल खानाचा पन्हाळ गडाच्या पायथ्याशी केलेला वध, शिव पराक्रम पाहून सुलतानशाही बेचैन झाली.
पन्हाळ गडाला सिधी जोहरचा वेढा, राज्याभिषेक अशा पद्धतीने बाराव्या शतकापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्टपणे सादर करण्यात आले. या महानाट्य यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 10 हजारापेक्षा अधिक नागरिकांनी हे महानाट्य अत्यंत एकाग्र होऊन पाहिले.