Tuesday, October 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

MH13 News by MH13 News
3 hours ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
0
SHARES
0
VIEWS
ShareShareShare

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने नागरिकांमध्ये भीती; लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

MH 13 News

सोलापूर : विशेष प्रतिनिधी

#सोलापूर शहरात भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मार्च २०२५ ते एप्रिल २०२६ या १४ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७ हजार ९१० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. या नागरिकांना मदर तेरेसा पॉलीक्लिनिक येथे श्वानदंश प्रतिबंधक उपचार आणि लसीकरण करण्यात आले.

#शहरातील विविध रहिवासी वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.

#केवळ १४ महिन्यांत ७,९१० श्वानदंशमार्च २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत नोंद झालेला ७,९१० हा केवळ कुत्र्यांच्या चाव्याचा आकडा आहे. या नागरिकांना रेबीजपासून बचावासाठी आवश्यक प्रतिबंधक उपचार आणि लसीकरण करण्यात आले.

#एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना कुत्र्यांचा चावा लागणे ही शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येची तीव्रता दाखवणारी बाब आहे. सुदैवाने उपलब्ध माहितीनुसार या कालावधीत श्वानदंशामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

सप्टेंबरमध्ये ६१८ प्राणीचाव्याच्या घटना..

#दरम्यान, सप्टेंबर २०२६ या एका महिन्यात एकूण ६१८ नागरिकांना विविध प्राण्यांनी चावा घेतल्याची नोंद झाली आहे. यामध्ये १३५ प्रकरणे पाळीव कुत्र्यांची, तर ३६४ प्रकरणे भटक्या कुत्र्यांची आहेत.म्हणजेच सप्टेंबर महिन्यात एकूण ४९९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला. याशिवाय ११९ प्रकरणे मांजर अथवा इतर प्राण्यांच्या चाव्याशी संबंधित आहेत.त्यामुळे ६१८ हा एकूण प्राणीचाव्याचा आकडा असून, त्यातील ४९९ प्रकरणे थेट कुत्र्यांच्या चाव्याची आहेत. ही आकडेवारी स्वतंत्रपणे पाहिल्यास शहरातील श्वानदंशाची समस्या किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.

#सप्टेंबरमध्ये १,७५१ जणांना रेबीज प्रतिबंधक लस..श्वानदंश आणि इतर प्राण्यांच्या चाव्याच्या घटनांबरोबरच प्रतिबंधक लसीकरणाची संख्याही मोठी आहे.

सप्टेंबर २०२६ मध्ये नव्या-जुन्या मिळून तब्बल १ हजार ७५१ नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली.याबाबतची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांनी दिली.

#भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे नागरिक त्रस्त..शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते, गल्लीबोळ, कचरा साचणारे परिसर तसेच रहिवासी वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या मागे कुत्र्यांच्या टोळ्या लागणे, पादचाऱ्यांचा पाठलाग करणे तसेच लहान मुलांवर झडप घेण्याच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी आहेत.विशेषतः सकाळी आणि रात्री फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, शाळेत जाणारी मुले तसेच कामानिमित्त रात्री उशिरा घरी परतणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

महापालिका प्रशासनासमोर आव्हान

#शहरात श्वानदंशाच्या घटना सातत्याने नोंद होत असताना भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. केवळ तात्पुरती कारवाई न करता भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि संख्या नियंत्रणासाठी सातत्यपूर्ण मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.

#नागरिकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सोलापूरकरांमधून होत आहे.

दरम्यान,१४ महिन्यांत ७,९१० नागरिकांना श्वानदंश आणि त्यानंतर सप्टेंबर २०२६ मध्येही ४९९ नागरिकांना कुत्र्यांचा चावा लागल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर आता भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर महापालिका प्रशासन काय ठोस पाऊल उचलणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.Solapur Municipal Corporation, Solapur

Tags: solapurSolapur Maharashtrasolapur municipal corporation
Previous Post

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

Related Posts

व्यापार

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

5 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.