सोलापूर टेक्स्टाईल ते शेळगी येथे जात असताना चार चाकी बोलेरो ने जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील दोन्ही महिला हे जखमी झाले.

रोहिणी सुरेश पुप्पल वय वर्ष 45 राहणार शेळगी सोलापूर व उषा नारायण वाघे वय वर्षे 38 राहणार लोहारा उमरगा जिल्हा धाराशिव असे या अपघातात दुचाकी वरील जखमी झालेल्या दोन्ही महिलांचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तीन वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहन क्रमांक MH 13 CC 3569 ने सोलापूर टेक्स्टाईल ते शेळगी असे जात असताना सोलापूर टेक्स्टाईल समोर हैदराबाद रोड मे येणाऱ्या चार चाकी बोलेरो क्रमांक MH 42 AU 2024 ने डिव्हायडरला धडक दिली आणि इतक्यावरच ते न थांबता त्या बोलेरो ने दुचाकी वाहनाला देखील धडक दिली.

सदर अपघातात जखमी झालेल्या दोन्ही महिलांना सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे. यातील रोहिणी उप्पल ही महिला गंभीर जखमी असून बेशुदावस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे. तर उषा वाघे या शुद्धीवर आहेत.