mh 13 news network
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 19 वर्षाखालील महिलांचे सुपर लीग सामने पुणे याठिकाणी चालू आहेत.
आज सोलापूर संघाचा उपांत्य सामना दिलीप वेंसरकर पुणे या संघाशी झाला.अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सोलापूर महिला संघाने 5 विकेट ने विजय मिळवला.प्रथम फलंदाजी करत पुणे संघाने 210 धावा केल्या सोलापूर संघाकडून पुनम मा शाळे हिने 4 बळी घेतले.प्रतिक्षा नंदर्गी 2, भक्ती पवार 2, साक्षी लांबकाने 1 बळी घेतले.210 धावांचे आव्हान सोलापूर संघाने 5 गडी राखून पूर्ण केले सोलापूर कडून आर्या उमाप 47 , प्रतिक्षा नंदर्गी 47, स्नेहा शिंदे 23, कार्तिकी देशमुख 22, भक्ती पवार 20 धावा केल्या.या संघाला स्नेहल जाधव मॅडम,किरण मणियार मॅडम,मानसी जाधव कदम मॅडम,सारिका कुरुलकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या यशाबद्दल सोलापूर क्रिकेट असोसिएशन चे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील तसेच संयुक्त सचिव धैर्यशिल मोहिते पाटील व चंद्रकांत रेंबर्सू सर यांनी अभिनंदन केले आणि शुभेछा दिल्या.