MH 13 NEWS NETWORK
आज श्री गणेश जयंती . त्या निमित्त शहरात सर्वत्रच विविध धार्मिक विधी पाळणा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्भूमीवर गुलमोहोर सोसायटी वसंत विहार येथे श्री गणेश मंदिरात आकर्षक मंडप , फुलांनी , फुग्यानी विशेष सजावट करण्यात आली होती . रांगोळ्यांच्या पायघड्या ही या दरम्यान घालण्यात आल्या होत्या . सकाळच्या सत्रात अशोक चंदन व सुविदय पत्नी विद्या अशोक चंदन या दाम्पत्याच्या हस्ते होम हवन सोहळा पार पडला.यानंतर दुपारच्या सत्रात पाळणा महाआरती व भक्त भाविकां
साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की जय चा एकच जयघोष केला .
साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गजानन महाराज की जय चा एकच जयघोष केला .
यावेळी उमाकांत शिंदे ,नवनाथ जाधव ,संताजी माने, अशोक चंदन, सतीश कुमार शेंडगे ,औदुंबर गायकवाड, गणेश गंगणे, बाळासाहेब एकाड, सी .पी .माने ,राजू बिराजदार ,रवींद्र कारंजे विनु गोपालगोपाल शेट्टी अमोल लांहडे लक्ष्मण मोरे नारायण पुजारी, सतीश पतंगे महिलावर्ग शोभा शिंदे ,किरण चंडक ,सुरेखा गंगणे ,भावना शेट्टी विद्या चंदन शिवकन्या शेळेकर ,पुष्पा जाधव, शकुंतला जाधव हर्षद जाधव, आरती लांडे, सुनीता पाटील ,शारदा बंडगर , बिराजदार सुनंदा फंड ,अपर्णा यादव पाटील,पुष्पा जाधव, सुनिता पाटील, सुरेखा लांडे , निर्मला कस्तुरे,यांच्यासह भक्त भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दानशूर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले…