Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

बीड: आजपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू

MH 13News Network

बीड ,दि. १७ :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत.  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिलपासून सुरु होणार आहे. या धर्तीवर आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत केकान, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यावेळी उपस्थित होते. 18 एप्रिलपासून  25 एप्रिल पर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र निशुल्क दिले जातील. या ठिकाणीची पाहणी केली.  उद्यापासून या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे खर्च निरीक्षक बसणार असून त्यांच्या पक्षाची पाहणीही त्यांनी यावेळी केली.

या कार्यालयाच्या बाजूला असणारे जिल्हा माहिती केंद्र (नॅशनल इंफॉर्मेशन सेंटर) येथे असणारे सीव्हीजील कक्ष आणि सायबर कक्ष याची देखील पाहणी जिल्हादंडाधिकारी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असून उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेबाबतही प्रत्यक्ष पाहणी केली. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांसोबत पाच लोक असतील तसेच तीन वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य व्यवस्था असावी, असे, निर्देश त्यांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर सहा विधानसभा मतदारसंघनिहाय  अद्यावत मतदार याद्या ठेवण्यात आलेल्या आहेत. लोकसभा मतदारसंघात उभे असणारे उमेदवारांकरिता ‘निदेशक पुस्तिका 2023’ ही मराठी तसेच उपलब्ध असणार आहे याची स्वतः खातरजमा जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. बाहेरून येणाऱ्या निरीक्षकांसाठी अपेक्षित साहित्य, उमेदवारांना आवश्यक असणारी माहिती, त्यांच्या मदतीला असणारे सहाय्यक त्यांना लागणारी माहिती याचा ही आढावा घेतला.

Previous Post

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

Next Post

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही ; प्रणिती शिंदे यांचे टीकास्त्र

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही ; प्रणिती शिंदे यांचे टीकास्त्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.