MH 13News Network
पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा
भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही. जेव्हा जेव्हा यंत्रमाग कामगार अडचणीत येतात. तेव्हा त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहिला आहे. मागील १५ वर्षे पद्मशाली समाजाने विधानसभेसाठी पाठिंबा दिला आहे. यंदा लोकसभेच्या मोठ्या रणागंणातही आशीर्वाद असे आवाहन सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले.
सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बुधवारी पाठिंबा जाहिर करण्यात आला. यावेळी माजी केद्रींय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, महेश कोठे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, जे यंत्रमाग कामगार, कारखानदार आहे त्यांच्या डोक्यावर जीएसटीचा राक्षस अजूनही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली, याचा फायदा कुणालाही झाला नाही. उलट नोटबंदीचा त्रास विडी कामगारांना झाला. यंत्रमाग कामगारांचे देखील नोटबंदीमुळे नुकसान झाले. तसेच भाजप सरकार आल्यापासून गॅस दारात मोठी वाढ झाली आहे. सर्वात जास्त याचा त्रास महिलांना झाला आहे. आठ दिवसाला पाणी मिळत आहे. भाजपने दोन वर्षांपासून महानगरपालिका निवडणूक घेतली नसल्यामुळेच ही वेळ आली असल्याचा घणाघाण प्रणिती शिंदे यांनी केला.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांनी, भाजप आणि त्यांच्या दोन्ही खासदारांवर सडकून टीका केली. सुशिलकुमार शिंदे यांनी यंत्रमाग धारकांसाठी कोट्यावधी रूपयांचे पॅकेज जाहीर केले होते. तर शरद पवारांनी ७२ हजार कोटी रूपयांची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र, भाजपच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. त्यांनी फक्त फसवे आश्वासन दिले. मागील १० वर्षात भाजपच्या खासदारांनी कोणतेही काम केले नाही. उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली. यातूनच ते निष्क्रिय ठरल्याची बोचरी टीका केली. दरम्यान, यावेळी मतदारांनी रामावरून धार्मिक वाद न घालता सर्वधर्म समभावाची भूमिका घेणे गरजेचे आहे. यासाठी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी, असे म्हणत त्यांनी तुतारी वाजवणाऱ्या हाताच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी वरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीसह जनार्दन कारमपुरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मुरली सुंचु, अशोक बल्ला, उद्योगपती श्रीधर बोल्ली, गोवर्धन सादुल, लक्ष्मीनारायण कमटम, मल्लिकार्जुन कमटम, सुधाकर गुंडेली, रविंद्र चौडेकर, गोवर्धन सूंचू, रविंद्र गेंट्याल, राजमहेंद्र कमटम, गोवर्धन कमटम, संतोष सोमा, वासुदेव इप्पलपल्ली, उमेश मामड्याल, तिरुपती परकीपंडला, राहुल गंजी, श्रीनिवास येमुल, रायमल्लु कमटम, रमेश कैरमकोंडा, श्रीनिवास गाली, राम गड्डम, अनिल वासम, गणेश बुधारम, रेणुका बुधारम, व्यंकटेश देवसानी, सत्यनारायण गड्डम, राजय्या गज्जम, अमर देवसानी, सुरेश नक्का, श्रीधर गंगुल, वीरेंद्र पद्मा, मल्लेश कारमपुरी, बाळकृष्ण मल्ल्याल, सन्नी कोंडा, शिवा श्रीराम, विजय नीली, नरेंद्र येमुल, रामकृष्ण श्रीराम, तुलसीदास मिठ्ठा, श्रीनिवास बडगु, रमाकांत गांगुल, श्रीनिवास येलदी, केशव पोलशेट्टी, मनोहर माचरला, मनोहर विडप, योगेश मार्गम, भारतीताई इप्पलपल्ली, मंजुश्री वल्लाकाठी, लक्ष्मीकांत साका, विवेक कन्ना, निरंजन बोद्धुल, अशोक वडणाल, प्रभाकर भिमनाथ, नरसिंग तू, लता गुंडला, भारती यक्कलदेवी, नागेश म्याकल, रमेश विडप, राजू नंदाल, रेणुका बुधारम, नागेश बोमड्याल, लक्ष्मण गडगी, व्यंकटेश नंदाल, अनिल कोंडुर, सत्यनारायण लगशेट्टी, रवी गड्डम, सुनील सारंगी, श्रीनिवास पोटाबत्ती, मेघश्याम गौडा, दशरथ सामल, मल्लेशम येमुल, श्रीनिवास विडप, बालाजी येज्जा, लक्ष्मीनारायण दासरी, दयानंद मामड्याल, प्रवीण मुसपेठ, सतिष संगा, राकेश महेश्वरम, श्रीकांत कोंडा, शिवराज दासी, नागेश येमुल, श्रीनिवास परकीपंडला, भूषण येले, गोवर्धन सरगम, चंद्रमोगली कमटम, शार्दुल कोठे, विलास श्रीराम, नरेश येलुर, अशोक कमटम, अंबादास तुम्मा आदि मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.