Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माढा,सोलापुरात मराठा समाज देणार तगडा उमेदवार.! ; माळशिरस मध्ये गुरुवारी महाबैठक

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
205
VIEWS
ShareShareShare

महेश हणमे /9890440480


सकल मराठा समाजाने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांत सर्वांच्या सहमतीने एक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी माळशिरसमध्ये उद्या गुरुवारी समाज बांधवांच्या जाहीर बैठकीचे आयोजन केल्याची माहिती समन्वयक माउली पवार यांनी मंगळवारी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्च रोजी महाबैठकीतून लोकसभा निवडणुकी संदर्भात भूमिका ठरवण्याचे आवाहन केले होते.या पार्श्वभूमीवर मराठा समाजात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.  या बैठकीतील अहवाल मनोज जरांगे पाटील यांना 29 मार्च 2024 रोजी सादर करण्यात येणार आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी घेण्यात आलेल्या महाबैठकीचे रूपांतर जाहीर सभेत झाले होते त्यास मराठा समाज बांधवांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांची भूमिका ठरविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २४ मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे महाबैठकीचे आयोजन केले होते. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात समाज बांधवांच्या सहमतीने एकच उमेदवार द्यावा. या उमेदवाराला मराठा समाजाने पाठिंबा द्यावा. दुसऱ्या कोणत्याच पक्षातील कार्यक्रमाला अथवा सभेला आरक्षण आंदोलनातील मराठ्यांनी जाऊ नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते.


सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्यासाठी आरक्षण आंदोलनातील नेत्यांनी काम करावे, असा निर्णय या बैठकीत झाला होता. त्यानुसार सोलापूर व माढ्यात एकच उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी दिली.

माढा हा देश पातळीवरील चर्चेतील मतदारसंघ आहे. या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी एक साखर कारखानदार, एक उद्योजक, एक शिक्षण सम्राट, एक डॉक्टर संपर्कात आहेत.

दरम्यान,सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी एक माजी आमदार, भाजपातील एक माजी पदाधिकारी,एक सनदी अधिकारी, एका माजी नगरसेविकेसह अनेकजण इच्छुक आहेत. सोलापूरची बैठक शुक्रवारी होईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवगातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे, ही समाजाची मागणी आहे. या मागणीला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला आम्ही सर्व संमतीने उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊ, असेही माऊली पवार यांनी सांगितले.

माढा लोकसभा मतदार संघातील फलटण, माण ,माळशिरस, सांगोला ,करमाळा ,माढा या सर्व तालुक्यातील व या लोकसभा मतदार संघांत  येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांची गुरुवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी दुपारी  2.00 वा अक्षता मंगल कार्यालय माळशिरस,माळशिरस- अकलूज रोड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

Tags: election commissionLoksabha electionmanoj Jarange Patil
Previous Post

मतदान केंद्रावर दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी

Next Post

प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने घेतली  जरांगे पाटलांची भेट ; नवं फॅक्टर होणार..?

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने घेतली  जरांगे पाटलांची भेट ; नवं फॅक्टर होणार..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.