MH 13 NEWS NETWORK
दर्शनासाठी भाविकांच्या लागल्या रांगा : आज पारंपारिक मार्गावरून रथ मिरवणूक

सोलापूर : प्रतिनिधी
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात भाविकांना २ टन लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे २० हजार लाडू प्रसादाच्या पाकिटांचे वितरण शुक्रवारी झाले.
शुक्रवारी पहाटे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर सामूहिक आरतीनंतर श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांच्या बंधूंचे पणतू रमेश टेंबे आणि भक्त मीना जोशी यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यानंतर विविध भजनी मंडळांनी सुरेल भजने सादर करीत भक्तांना ठेका धरायला लावला.
यावेळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, मंदिर समिती सदस्य सुभाष बद्दरकर, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामभाऊ कटकधोंड, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.
आज रथ आणि पालखी मिरवणूक
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी (दि. १५) शहरातील पारंपारिक मार्गावरून रथ आणि पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात समोर होईल. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले आहे.
शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळींबी आड शिंदे चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, यावेळी प्रमुख पाहुणे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज फडकण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली, त्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले,
यानंतर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला, आपले मनोगत व्यक्त करताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, यांनी शिवजयंती निमित्त शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, राजन जाधव, दिलीप कोल्हे, श्रीकांत डांगे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, विनोद भोसले, श्रीकांत घाडगे, घाडगे गुरुजी, मनोज गादेकर, सुनील रसाळे, महेश हनमे, जगदीश पाटील, बाळासाहेब पुणेकर, तात्यासाहेब वाघमोडे, मतीन बागवान, बजरंग जाधव, मारुती सावंत, अमोल कळंब, सदाशिव पवार, नरेश मोहिते, रवी मोहिते, राजु सुपाते, विवेक इंगळे, अंबादास शेळके, प्रीतम परदेशी, ब्रम्हदेव पवार, लिंगराज जाधव, सचिन चव्हाण, सुभाष पवार, आदित्य घाडगे, डॉक्टर, लक्ष्मणराव काळे, संदीप जाधव, अनिल छत्रबंद, सुनील शेळके, अनिल म्हस्के, जितू वाडेकर, विनायक टेंभुर्णीकर, महादेव गवळी, लहू गायकवाड, विजय पुकाळे, दिनकर जगदाळे, सचिन गुंड, प्रकाश ननवरे, गोवर्धन गुंड, विश्वजित गायकवाड, सोमनाथ शिंदे, सचिन स्वामी झ बसू कोळी, देविदास घुले, राजू काकडे, दिनकर जगदाळे, सुनील भोसले, प्रताप चौहान, रमेश जाधव, राम माने, सचिन चव्हाण, राजू व्यवहारे, रोहन माने, श्रीनिवास संगा, महेश जिंदम, सुष्माताई घाडगे, लता फुटाणे, सुनंदा साळुंखे, मनीषा नलावडे, लता ढेरे, मनीषा महाडिक, श्रद्धा कंदुरे, वंदना भिसे, प्रतीक्षा चव्हाण, अश्विनी भोसले, वैजयंती भोसले, चारुशीला जगदाळे, नीलिमा शितोळे, मनीषा माने, पूजा शेळवणे, दीपाली चव्हाण, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते