Sunday, June 29, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

गृह मतदानासाठी घरी आलेल्या मतदान पथकांचे दिव्यांग, ८५ वर्षांवरील मतदारांनी मानले आभार

MH 13 News by MH 13 News
3 May 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
गृह मतदानासाठी घरी आलेल्या मतदान पथकांचे दिव्यांग, ८५ वर्षांवरील मतदारांनी मानले आभार
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13N NES NETWORK

पहिल्याच दिवशीगृह मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • दिव्यांग, अंथरुणाला खिळलेल्या मतदारांना बजाविता आला अधिकार
  • मतदान करता आल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर झळकले हास्य

लातूर : मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाला आज (दि. 2) पासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी केली. गृह मतदानासाठी घरी येणाऱ्या मतदान पथकांचे आभार मानत दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांनी आपला हक्क बजाविला. वयोवृद्धता, दिव्यांगत्व यामुळे मतदान केंद्रावर जाणे शक्य होऊ शकले नसते, मात्र गृह मतदान सुविधेमुळे मतदान करता आल्याचा आनंद यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर झळकला.

टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध होण्यासाठी दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांकडून 17 एप्रिल 2024 पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत 12 (डी) अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार 85 वर्षांवरील 1 हजार 893 आणि 463 दिव्यांग मतदार असे एकूण 2 हजार 356 मतदार गृह मतदानासाठी पात्र ठरले. या मतदारांचे घरोघरी जावून मतदान करून घेण्यासाठी 130 मतदान पथके स्थापन करण्यात आली. प्रत्येक पथकात दोन मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, व्हिडीओग्राफर आणि मायक्रो ऑब्झर्व्हर यांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये गोपनीयतेचा भंग होवू नये, यासाठी विशेष खबर

दारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. त्यानुसार 2 मे रोजी गृह मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्वतः उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील गृह मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी उदगीर शहरातील 31 वर्षीय दिव्यांग पूजा कासले यांच्या घरी त्यांनी भेट दिली. दिव्यांगत्वामुळे मतदान केंद्रावर जाणे टाळणाऱ्या पूजा कासले यांनी यावेळी गृह मतदानाद्वारे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजाविल्याचे सांगितले. तसेच या सुविधेमुळे मतदान करता आल्याचा आनंद व्यक्त केला. उदगीरचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर आदी यावेळी उपस्थित होते. करडखेल येथील पंढरी माणिक कसबे, दिलीप कसबे, तसेच लोहारा येथील मुक्ताबाई सोपानराव मोगले यांच्या गृह मतदानावेळी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी उपस्थित राहून मतदान प्रक्रियेची पाहणी केली. तसेच मतदारांच्या गृह मतदानानंतरच्या भावना जाणून घेतल्या.

लातूर शहरातील औसा रोड परिसरातील श्रीमती गोदावरी कुलकर्णी यांचे वय 101 वर्षे आहे. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे त्यांना गेली दोन वर्षे कोणतीही हालचाल करता येत नसल्याने अंथरुणावर पडून आहेत. त्यांना मतदान केंद्रावर घेवून येणे शक्य नव्हते, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. मात्र, गृह मतदान सुविधेमुळे यावेळी त्यांचे मतदान होवू शकल्याचे समाधान त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, लातूरच्या उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, नायब तहसीलदार गणेश सरोदे उपस्थित होते.

लातूर येथील लेबर कॉलनी येथील 104 वर्षे वयाच्या अहेमद खुदबोद्दिन शेख यांनाही आता आजारपण आणि वृद्धावस्थेमुळे घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे यावेळी मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी ते मतदान केंद्रावर आले नसते, असे त्यांचे नातू अजीम सलीम शेख यांनी सांगितले. मात्र, गृह मतदान सुविधेमुळे त्यांना मतदानाचा हक्क बजाविता आला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. याच परिसरात राहणाऱ्या 87 वर्षीय किसनाबाई ताकपिरे यांनीही मतदान पथकाने घरी येवून आपले मतदान करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच यासाठी 12 (डी) अर्ज भरून घेतलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचे मनोमन आभार मानले.

उर्वरित दिव्यांग, 85 वर्षांवरील मतदारांसाठी 4 मे रोजी मतदान पथके जाणार घरोघरी

 2 मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात गृह मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. याबाबत संबंधित मतदारांना बीएलओ मार्फत पूर्वसूचना देण्यात आली. पहिल्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत दिव्यांग आणि 85 वर्षांवरील सुमारे 1 हजार 389 म्हणजेच जवळपास 60 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. काही कारणांमुळे 2 मे रोजी घरी उपस्थित नसलेल्या पात्र मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी 4 मे 2024 रोजी मतदान पथके पुन्हा त्यांच्या घरी जाणार आहेत. यादिवशी घरी उपस्थित नसलेल्या मतदारांचे मतदान नोंदविले गेले नाही, तर अशा मतदारांना मतदान केंद्रावर जावून मतदान करता येणार नाही. उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 3 मे आणि 4 मे या दिवशी मतदान पथके घरोघरी जाणार आहेत.

Previous Post

संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

Next Post

खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची मीडिया कक्षाला भेट  

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
वाढदिवसानिमित्त शाळेला स्पिकर सेट; तुषार साठे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
राजकीय

वाढदिवसानिमित्त शाळेला स्पिकर सेट; तुषार साठे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

20 June 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचं निधन
धार्मिक

श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचं निधन

20 June 2025
Next Post
खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची मीडिया कक्षाला भेट  

खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची मीडिया कक्षाला भेट  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.