MH 13 NEWS NETWORK
आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत बाबा सालार यांचा झाला प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना अजितदादा पवार यांचै विकासात्मक धोरण अल्पसंख्यांक वंचितांना न्याय देण्याची त्यांची भुमिका यावर प्रभावित होऊन प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा सालार यांनी राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी तसेच जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत नई जिंदगी येथे शेकडो समर्थकासह मोठ्या उत्साहात जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला

बाबा सालार यांनी पक्ष प्रवेश केल्याने त्यांचा पक्षाला फायदा होणार असून या आजूबाजूच्या सर्व प्रभागांमध्ये त्यांची मदत होईल येणार्या महानगरपालिकेला निवडणुकीत आम्ही मिळून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणू अशी ग्वाही अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख यांनी दिली

यावेळी बोलताना बाबा सालार यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी व माझे सर्व सहकारी प्रामाणिकपणे काम करून चांगला रिजल्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत ..
बाबा सालार पक्षात आल्याने पक्षाची ताकद अजून वाढेल बाबा यांचे समर्थक सोलापूर शहरभर असून त्यांचे पक्षात येण्याने अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक निवडून येण्याकरिता त्यांचे सहकार्य लाभेल असे मत कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी व्यक्त केले.
या भागातील प्रभागांमध्ये बाबा आणि अमीर शेख जो काही निर्णय घेतील त्या निर्णया सोबत आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू मत प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केले
बाबा सालार यांचे निश्चितच पक्षाला फायदा होणारच आहे अल्पसंख्यांक समाजाचा विकास करणे समाजातील प्रश्न मार्गी लावणे याकरिता बाबा सालार यांना ताकद देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल आज आमदार इद्रीसभाई नाईकवाडी बाबा सालार यांच्या पक्ष प्रवेशास आदरणीय अजितदादांचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आज येथे या सोहळ्यात उपस्थित आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा सालार आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी मनःपूर्वक स्वागत करतो असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केले
अध्यक्ष भाषणामध्ये आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वागीण विकास करीता अजितदादांनी केलेले काम आणि सोडवलेल्या समस्या तसेच शासन स्तरावर अल्पसंख्याकांच्या न्याय हक्कासाठी मांडलेले प्रश्न , अल्पसंख्यांकाच्या अडचणीच्या काळामध्ये धावून आलेले प्रसंग याचा लेखाजोखा मांडला
बाबा सालार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी स्वागत करतो येणार्या काळामध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्न सोडवण्याकरिता त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता बाबा सालार यांना ताकद देण्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे आपण सर्वजण लोकांचे प्रश्न सोडवून पक्ष बळकट करण्याचे आवाहन देखील आमदार इद्रीसभाई नायकवाडी यांनी केले.
याप्रसंगी आमदार इद्रिस नाईकवाडी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश सचिव शशिकांत कांबळे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख जेष्ठ समाजसेवक सेवक सत्तार चाचा शेख फिजाओद्दीन आबादिराजे, नासिर बागवान, जाविद मुल्ला, शकील भाई इनामदार, शब्बीर मेमन, इम्रान भाई सालार, बब्बू (वसीम)शेख रौफ अरब, अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष संजू मोरे नुतून अल्पसंख्यांक मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार वाहतूक अध्यक्ष इरफान भाई शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहाराज आबादिराजे,अल्पसंख्यांक दक्षिण अध्यक्ष अशपाक कुरेशी, दक्षिण संघटक जहीर शेख,प्रदीप बालशंकर, अनिल बनसोडे, सोमनाथ शिंदे, शामराव गांगुर्डे, आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते....