Tuesday, July 1, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

MH 13 News by MH 13 News
11 May 2024
in महाराष्ट्र
0
युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

मतदान जनजागृतीसाठी ठाण्यात ‘रन फॉर वोट’ या ‍मिनी मॅरेथॉनचे आयोजन

ठाणे, दि. 11 लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित केलेल्या रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना दिला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मुख्य रस्त्यावर ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. सदर मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून सुरूवात केली.

प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे असे आवाहन ठामपा सौरव राव यांनी उपस्थित मतदारांना केले.

रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक कर्मचा-यांनी धावपटू मतदारासोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. तसेच स्वीपच्या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. मी मतदान करणारंच… आपण ही मतदानासाठी सज्ज रहा या आशयाचा मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असलेले माहितीपत्रकाचे वाटपही उपस्थित धावपटू मतदार व नागरीकांना करण्यात आले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदार जनजागृतीच्या घोषणा दिल्या.

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन रन फॉर वोट’ मिनी मॅरेथॉन मध्ये सहभागी असलेल्या सर्व नागरिकांना १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मार्फत करण्यात आले

Previous Post

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

बाळे येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
Next Post

बाळे येथील शिक्षकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.