Saturday, April 25, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ; १८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ; १८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

जिल्हाधिकाऱ्यांनी घरी जाऊन मतदारांना दिले निमंत्रण; नोंदणी केलेले ६९९ मतदार करणार मतदान

नांदेड : निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोल चीट (Voter Information Slip ) वाटप करण्यात येते. या मतदार चिठ्ठीमध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र कोणते, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रुम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे. नांदेड मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अशा काही मतदारांच्या घरी पोल चिठ्ठी पोहचवून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

16 नांदेड लोकसभातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चिखलवाडी, वजिराबाद व गुजराती हायस्कूल परिसरात मतदारांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना व नवमतदारांना पोलचिटचे  (मतदान माहिती चिठ्ठी ) वाटप केले. 85 वर्षे वयाच्यावरील नागरिकांना पूर्वकल्पना दिली. यापैकी काही मतदार हे होम व्होटिंग करणार आहेत. 12 डी फॉर्म भरून 699 मतदारांनी घरी पोस्टल मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. नांदेड दक्षिण बूथ नंबर 60 मध्ये होम वोटिंग लाभ घेत असलेल्या कस्तुरबाबाई शर्मा यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते मतदार चिठ्ठी देण्यात आली. त्यांना आश्वस्त केले, की तुमच्या घरी तुमचे मतदान नोंदवण्यासाठी टिम येईल. जेष्ठ वयोवृद्ध मतदार श्रीमती शर्मा यांनी यावेळी मतदान नोंदवणारच, असा निर्धार व्यक्त केला.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी काही नवमतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी (पोलचिट ) स्विकारली. मी मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जेष्ठांमध्ये असणारा उत्साह तरुणांनी देखील दाखवावा, असे आवाहन केले आहे. यावर्षी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून नागरिकांनी सुदृढ लोकशाहीच्या जपवणुकीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू, गुजराती हायस्कूल नांदेड बुथ क्रमांक 60 चे बि.एल.ओ. पी.डी. कोळपेवाड व महानगरपालिका प्रा शा वजीराबाद बुथ क 57 चे बि.एल.ओ. सुधाकर, नांदेड दक्षिणचे बि.एल.ओ. समन्वयक गुलाम नबी हे उपस्थित होते.

Previous Post

Narayan Rane News : रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंना भाजपची उमेदवारी जाहीर..

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.