MH 13News Network
भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली असून रत्नागिरी सिंधुदुर्गातून त्यांना उमेदवारी दिल्याचे भाजपाने आज गुरुवारी जाहीर केले.
उदय सामंत यांनी नारायण राणे यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आणि प्रचार करण्याचे काही वेळापूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारीचा तिढा सुटलेला आहे. उदय सामंत यांनी एक पाऊल मागे घेतल्यामुळे भाजपाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज नारायण राणे यांच्या उमेदवाराची घोषणा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.