MH 13News Network
संपूर्ण देशाचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागलेले असताना एक्झिट पोलमध्ये भाजपला पुन्हा विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दाखवले असून मोदींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहर उत्तरमधील बाळे भागांमध्ये आमदार विजयकुमार देशमुख, भाजप युवा नेते डॉ.किरण देशमुख यांच्या उपस्थितीत संगीतमय भव्य स्नेहमेळावा घेण्यात आला.
बाळे प्रभाग क्रमांक 05 काल दि. 2 जून रविवारी माजी पालकमंत्री शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत स्नेह मेळावा संपन्न झाला .
यावेळी या कार्यक्रमासाठी युवा मोर्चा शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉ.किरण देशमुख, माजी सभागृह नेता संजय कोळी,प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मेळावा संपन्न झाला. राजेश्वरी नगर येथील शाळेच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषामध्ये मेळावा पार पडला.
हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी युवा नेते राजू आलुरे,विनय ढेपे, आनंद भवर,शिरीष सुरवसे,अमोल झाडगे,रामेश्वर झाडे ,शंकर मोळकरी पत्रकार विकास कस्तुरे, कैलास घुगे,नागनाथ पाटील, प्रभाग क्रमांक पाचमधील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. स्नेहभोजन आणि संगीतमय मैफिलीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.