Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज ; रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज ; रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद
0
SHARES
16
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

चंद्रकांतदादा कोथरूड मधून विक्रमी मताधिक्याने निवडून येणार- मुरलीधर मोहोळ

कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांंनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढलेल्या रॅलीत कोथरुडकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य कोथरुडकर मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते.

कोथरूड मधून नामदार चंद्रकांत पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा शपथ घेणार असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवीजी, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खा. प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेनेचे नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिपकभाऊ मानकर, आ. भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोथरुड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडीमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नामदार चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी शंकर महाराज, कसबा गणपती, मृत्यूंजयेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.

कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. या वेळी कोथरुड मधील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता.

कोथरूडकरांच्या मनातला आमदार, कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, सर्वसामान्यांचा नेता पुन्हा होणार विजेता, था थकत ना थांबत जनसेवेसाठी दादा सदैव कार्यतत्पर अशा आशयाचे फ्लेक्स घेऊन अनेक कार्यकर्ते आणि कोथरुडकरांनी दादांना प्रतिसाद देत होते.

या रॅली दरम्यान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कार्यालय, हुतात्मा चौक, दशभुजा गणपती मंदिर, नळस्टॉट येथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दादांचे स्वागत करण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, कोथरुडच्या जनतेने भारतीय जनता पक्षावर नेहमीच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.‌देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे गेल्या १० वर्षातील विकासकामे, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची राज्यभरातील सर्व सामान्य नागरिकांसाठी राबविलेल्या योजना आणि कोथरुडचे आमदार म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात राबविलेले सेवा उपक्रम आणि विकासकामे यामुळे कोथरुडची जनता समाधानी आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोथरुड मधून नामदार चंद्रकांतदादा पाटील विक्रमी मताधिक्याने निवडून येतील हे आजच्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सिद्ध झाले आहे, असा विश्वास व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कोथरूडकर जनतेने भारतीय जनता पक्षावर भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ७५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी बनवले. त्यामुळे आजच्या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहून कोथरुड विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Tags: Bjp indiaBJP Maharashtrachandrakant patilDevendra fadanvisKothrudMurlidhar moholNarendra Modi
Previous Post

‘दक्षिण’मध्ये आमदार पुत्र अमर पाटील उमेदवार ; संजय राऊत यांनी शब्द पाळला..!

Next Post

पवारांना मिळाला ” मार्ग” ; आंबेडकरांच्या साथीने दक्षिणेत उमेदवारी फिक्स

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
पवारांना मिळाला ” मार्ग” ; आंबेडकरांच्या साथीने दक्षिणेत उमेदवारी फिक्स

पवारांना मिळाला '' मार्ग" ; आंबेडकरांच्या साथीने दक्षिणेत उमेदवारी फिक्स

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.