जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ ज्ञानमंदिरात आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या कर्तव्यदक्ष व विविध कार्यामध्ये कुशल असणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला. महिलांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होणे ही आजच्या काळाची गरज असल्याचं प्रतिपादन डॉ प्राची जाधव यांनी आपल्या भाषणात केलं.
जिजाऊ ज्ञानमंदिर संकुलात या आहेत सन्मानित माता..
1)सौ. पूजा सिद्धांना सांगवी
2)सौ. स्मिता नागेश शिंदे
3) सौ. प्रीती विशाल बोबडे
4) सौ. रिझवाना असगर खान
5) सौ. अर्चना दत्तात्रय गुंड
6) सौ. संध्या अनिल जाधव
7) सौ. रोहिणी प्रमोद पवार
8) सौ.अर्चना सोमनाथ माने
9) सौ. पुष्पा राजू ताडमली
10) सौ .अपर्णा श्रीपती पवार
11) सौ .लक्ष्मी परमेश्वर वाणी
12) सौ.निलम विजय व्यवहारे
13) सौ. मीनाक्षी सुनील चव्हाण
14) सौ. पुष्पा किरण नन्नवरे
15) सौ. कविता सुभाष जाधव
16) सौ. सुजाता विलास तरटे
यांचा आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अकोलीकाटी च्या सरपंच सौ. अंजली क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतात आजच्या स्त्रीचे समाजातील स्थान व महत्व या बाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले.
त्याच बरोबर दुसर्या प्रमुख पाहुण्या कोंडीच्या सरपंच सौ. सुहासिनी निंबाळकर यांनी महिला दिनानिमित्त महत्व पूर्ण माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्राची जाधव यांनी महिलांना आर्थिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने कशाप्रकारे आपण व आपल्या परिवाराबद्दल कशाप्रकारे जागृत राहावे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी पालक समिती च्या अध्यक्ष श्रीमती अर्चना खंदारे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख व कुलकर्णी यांनी केले .
प्रास्ताविक प्राचार्या सुषमा नीळ यांनी केले. सर्व सत्कार मूर्तींचा परिचय औरादे यांनी मांडला, तर आभार प्रदर्शन सय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.