MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करुन अटक न करता जामीनवर सोडण्यासाठी ४५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती २५ हजार रूपयांची लाच खाजगी इसमाकरवी स्वीकारलेल्या पोकॉ सोमनाथ बबन माने याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं. ही घटना सांगोला पोलीस ठाणे परिसरात सोमवारी घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ माने व खाजगी इसमाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सांगोला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पो.कॉ. सोमनाथ बबन माने (ब.नं. २०३६) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्याच्या मुलाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ न करून अटक न करता जामीनावर सोडण्यासाठी तसेच गुन्ह्याचे तपासामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे पो.कॉ. माने व खाजगी इसम अक्षय दत्तात्रय पवार (रा. वाटंबरे) यांनी प्रथम ४५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालयाकडे प्राप्त झाली.

त्या तक्रारीची सोमवारी, २२ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली. कारवाईमध्ये प्रथम ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २५ हजार रुपये लाच रक्कम पो.शि. सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याचे तयार दर्शवून ती २५ हजार रुपये लाचेची रक्कम खाजगी इसम अक्षय दत्तात्रय पवार यांच्या हस्ते स्वीकारली. दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ अ,१२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय.
सापळा पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर चे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस अंमलदार सपोफौ/कोळी, पोह/सोनवणे, पोशि/किणगी, चापोह/गायकवाड यांनी कामगिरी बजावली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून कामगिरी पार पाडली.
…. आवाहन ….
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यांचेशी संपर्क करावा.
पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, रंगभवन चौक, सोलापूर ४१३४०३.
संपर्क पत्ता : –
संकेत स्थळ : acbmaharashtra.gov.in
ई-मेल : dyspacbsolapur@gmail.com
ऑनलाईन तक्रार अॅप : acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक : १०६४
दूरध्वनी क्रमांक : ०२१७-२३१२६६८