Wednesday, November 5, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी – पोलीस आयुक्त एम. राजकुमार

MH13 News by MH13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
254
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी

पोलीस आयुक्त एम. राज कुमार : १०० जन्मठेपांबद्दल १०० सामाजिक उपक्रमाचा रक्तदानाने शुभारंभ

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी काढले.

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल १०० सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्याचा शुभारंभ बुधवारी डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराने झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव सत्यनारायण गुंडला उपस्थित होते.



भारतमातेच्या प्रतिमापूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले, १०० गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून देणे हे कौतुकास्पद कार्य आहे. १०० जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून १०० पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे. ॲड. राजपूत यांनी पोलीस दलाच्या मेहनतीलाही फळ मिळवून दिले आहे. विधी क्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांनी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचा आदर्श घ्यावा.


पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, एखाद्या गुन्ह्यात वकिलाने गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणे हे अतिशय महत्त्वाचे काम असते. त्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी मेहनत करून  पीडितांची बाजू मांडली आणि पीडितांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाच्याही कामगिरीत सुधारणा दिसली.

जेष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे म्हणाले, जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करणे अतिशय अवघड काम आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ॲड. राजपूत यांनी काम केले. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने ते सातत्याने कार्यरत असतात.

प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर ॲड. प्रियंका पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमास अशोक संकलेचा, मदन मोरे, किरण सुतार, प्रशांत बडवे,
व्यंकटेश कैंची, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके, नितीन कवठेकर, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, ॲड. अजिंक्य जाधव, ॲड. अशोक श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
———
१२१ जणांनी केले रक्तदान

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांच्या सन्मानार्थ १२१ जणांनी रक्तदान केले. १०० गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे रक्तदान करुन अभिनंदन करण्यात आले.

Tags: Collector office solapursolapur CourtSolapur Maharashtra
Previous Post

बातमीचा दणका : आमदारांचा हस्तक्षेप, प्रशासनाची मक्तेदाराला नोटीस ; कामास लागला ‘ मुहूर्त ‘

Next Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

Related Posts

सोलापूर बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार..! सरन्यायाधीश म्हणाले..!
महाराष्ट्र

सोलापूर बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार..! सरन्यायाधीश म्हणाले..!

2 November 2025
🌿 शहरात जंगल!राज्यात सुरू होतोय ‘अर्बन फॉरेस्ट’ मिशन.. प्रत्येक शहर हरित.!– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कृषी

🌿 शहरात जंगल!राज्यात सुरू होतोय ‘अर्बन फॉरेस्ट’ मिशन.. प्रत्येक शहर हरित.!– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 November 2025
संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
धार्मिक

संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 November 2025
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! ‘वालेगावकर’ मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..
धार्मिक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा..! ‘वालेगावकर’ मानाचे वारकरी..| कार्तिकी एकादशी..

2 November 2025
ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता
गुन्हेगारी जगात

ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

1 November 2025
Solapur |अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता
सामाजिक

Solapur |अनैतिक संबंधातून खून केल्याच्या आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

1 November 2025
Next Post
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.