Tuesday, April 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महिलेच्या निर्घृण हत्याप्रकरणी तीन आरोपींना सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
महिलेच्या निर्घृण हत्याप्रकरणी तीन आरोपींना सेशन कोर्ट बार्शी यांनी सुनावली जन्मठेपेची शिक्षा
0
SHARES
26
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

माढा तालुक्यातील मौजे अकोले (बु) येथील आरोपी नामे आगतराव काळे याचा मुलगा अपघातात मयत झाला होता. मुलाची बायको कोमलला तिची आई लक्ष्मी गोकुळ पवार हिला तिची ननंद कीर्तीमाला, प्रीती उर्फ गुड्डी, सासू विमल भेटून देत नव्हती.


दिनांक 30-1-2021 रोजी सायंकाळी 6-00 वाजण्याचे सुमारास लक्ष्मी हीस मुलगी कोमल हिची भेट घालून देते म्हणून कीर्तीमाला, प्रीती यांनी बोलावून घेऊन तिच्याकडून 5000 रुपये घेऊन तिचा मयत भाऊ सोमनाथ अगतराव काळे याच्यावर लक्ष्मी हिने करणी केल्याचा राग मनात धरून कीर्तीमाला, प्रीती उर्फ गुड्डी, प्रीतीचा मित्र रॉकी उर्फ अक्षय उर्फ आकाश अशोक भालेराव, आगतराव काळे, विमल काळे या सर्वांनी कट रचून, मयत लक्ष्मी हिचा कोयता, सुरा, लोखंडी कुऱ्हाड या हत्यारांनी वरील आरोपींनी लक्ष्मीचे सू-याने नरडे कापले, हाताचे कोपऱ्यावर, पायाचे घोट्याजवळ, नडगीवर पिंडरीवर मांडीवर वार केले व सर्वांनी मिळून तिचा खून करून साडीस दगडे बांधून तिचे प्रेत विहिरीतील पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला.


वरील आरोपी विरुद्ध मयताची बहीण हिने टेंभूर्णी पोलीस ठाणेस गु.र.नं 50/2021 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री राजकुमार केंद्रे यांनी करुन आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.


सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी 14 साक्षीदार तपासण्यात आले.


यातील फिर्यादी व साक्षीदार करण भोसले, पो.कॉ. तुकाराम माने देशमुख यांची साक्ष, तसेच तपासी अंमलदार Dysp श्री राजकुमार केंद्रे यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, मृतदेह विहिरीमध्ये टाकून दिलेला कीर्तीमालाने दाखवणे त्याच्या आधारे साक्षीदार यांची साक्ष, प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार नव्हता तरीही परिस्थितीत जन्य पुराव्याच्या आधारे संपूर्ण गुन्ह्याची एकेक कडी ही सरकारी वकिल श्री दिनेश देशमुख यांनी मा न्यायालयासमोर मांडले.
सरकारी पक्षाचा पुरावा याचा विचार करता मा.जिल्हा न्यायाधीश श्री. व्हि के मांडे साहेब यांनी आरोपी 1) कीर्तीमाला आगतराव काळे वय 25 वर्षे, 2) आगतराव लक्ष्मण काळे वय 73 वर्षे, दोघे रा. अकोले बुद्रुक ता. माढा, 3) आकाश उर्फ अक्षय उर्फ रॉकी अशोक भालेकर वय 25 वर्षे रा. मांजरी ता.जि.लातूर यांना कोर्टाने दोषी ठरवून भा.द.वि. कलम 302 अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 3000/- रुपये दंड, भा.द.वि. कलम 120(ब) अन्वये 14 वर्ष शिक्षा व प्रत्येकी 2000/- रुपये दंड, भा.द.वि. कलम 201 अन्वये 3 वर्ष शिक्षा व प्रत्येकी 1000/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.


आरोपी क्रमांक 4 यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास Dysp श्री राजकुमार केंद्रे तत्कालीन पोलीस निरीक्षक व त्यांचे दप्तरी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर यांनी केला आहे..
सरकार पक्षा तर्फे श्री दिनेश देशमुख यांनी काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी काम पाहिले.
सदर केसमध्ये मा. श्री अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व मा. श्री दिपक पाटील पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आमदार देशमुखांनी घेतली भेट

Next Post

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या – लिंगायत धर्मगुरू प. पू. चेन्नबसवानंद महास्वामी

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या – लिंगायत धर्मगुरू प. पू. चेन्नबसवानंद महास्वामी

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या - लिंगायत धर्मगुरू प. पू. चेन्नबसवानंद महास्वामी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.