MH 13News Network
राज्याचे लक्ष हे सोलापूर आणि माढा येथील लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घडामोडी कडे लागलेले आहे. आज भाजपा उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला. भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे आता प्रचारामध्ये रंगत वाढणार असून खरी लढत सुरुवात होईल.
43-माढा लोकसभा मतदारसंघासाठी श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत आमदार संजय शिंदे, आमदार बबन शिंदे, आमदार शहाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी श्री. राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा आमदार राम सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, विकास वाघमारे तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूर शहरातून छत्रपती संभाजी राजे चौकातून विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने भाजपा तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती.