सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचे दुःखद निधन
सोलापूर – सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त, पांजरापोळ संस्थेचे अध्यक्ष तसेच सार्वजनिक श्रद्धानंद समाज आजोबा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

.ते समाजसेवेतील एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार पेठेतील त्यांच्या राहत्या घरापासून आज सायंकाळी ५ वाजता निघणार आहे.अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.