✍️ सोहेल फरास, सामाजिक कार्यकर्ता, अक्कलकोट
“मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या” – ही म्हण अक्कलकोटमध्ये अक्षरशः खरी ठरली.७ जून रोजी बकरीद ईदच्या दिवशी रंगोली ज्यूस सेंटरचे युनुस बागवान यांचा फोन आला…
मल्लिकार्जुन मंदिराजवळ एक अनोळखी महिला अतीव बिकट अवस्थेत पडलेली आहे. मी (सोहेल फरास) आणि रशीद खिस्तके घटनास्थळी पोहोचलो. दृश्य हृदय हेलावणारं होतं – त्या महिलेच्या अंगावर मुंग्या आणि माश्या होत्या. आम्ही तिला दुसऱ्या जागी नेऊन अंथरलं, पावडर मारली, साडी दिली. मंदिरात आलेल्या सफाई कामगार महिलांनीही साडी व्यवस्थित घालून दिली.

माणुसकीचा तो क्षण विसरणं अशक्य!युनुस बागवान यांनी पाणी, ज्यूस दिला. महिला हळूहळू बोलू लागली – नाव शांताबाई हजारे, पत्ता कुमठा, आदित्य नगर. मात्र कुणालाच तिची ओळख नव्हती. दोन दिवस आम्ही रात्रंदिवस विचारपूस, मदत करत राहिलो – डॉक्टर विपुल शहा यांनी स्वतः पेशंट सोडून तपासणी केली, औषधं दिली.९ जून रोजी फोटो स्टुडिओमधून एक आशेचा किरण मिळाला
– नातवाने फोटोसाठी दिलेल्या फोटोवरून तीच महिला असल्याची शक्यता. लगेच पोलिसांशी संपर्क साधला. राजेंद्र टाकणे, नितीन सुरवसे, रणजितसिंह भोसले या अधिकाऱ्यांनी तातडीने नातवाशी संपर्क केला.रात्री ९:१५ वाजता शांताबाईंचा नातू नागेश हजारे आणि पत्नी वंदना पोहोचले

– आजीला पाहून दोघंही अश्रू आवरू शकले नाहीत. आठवडाभर बेपत्ता असलेल्या आजीला जिवंत, सुरक्षित पाहणं त्यांच्यासाठी स्वप्नवत होतं.पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवून शांताबाईंना सुखरूप घरी नेण्यात आलं.—या कार्यात जे सहभागी झाले – ते म्हणजे खरे नायक:
रशीद खिस्तके
वसंत देडे
समीर चाबुकस्वार
युनुस बागवान
डॉक्टर विपुल शहा
पोलिस अधिकारी – राजेंद्र टाकणे, नितीन सुरवसे, रणजितसिंह भोसले
नीलकमल स्टुडिओचे सचिन चव्हाण—
ही घटना एक शिकवण देऊन जाते – माणुसकी अजूनही जिवंत आहे. आणि ती तुम्हा-आमच्यासारख्या सामान्य माणसांमधूनच प्रकट होते.
🙏 “माणुसकी जिंकल्याचं समाधान जगाच्या कुठल्याही संपत्तीपेक्षा मोठं असतं.” 🙏