वडाळा, ता. उत्तर सोलापूर | १६ जून २०२५ –
नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६च्या सुरुवातीचा उत्सव जिल्हा परिषद शाळा वडाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गावातून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीने झाली. या प्रभातफेरीमध्ये बैलगाडीतून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

सणासारख्या वातावरणात सजवलेली शाळा व परिसर आकर्षणाचे केंद्र ठरले.नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच त्यांचे शिक्षणातले ‘पहिले पाऊल’ मोठ्या सन्मानाने नोंदवण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष बळीराम (काका) साठे हे होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. राऊत, सौ. टोणपे, श्रीमती तिडके, श्री. थिटे आणि श्री. चवरे यांच्यासह शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.