MH 13 NEWS NETWORK
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अथक प्रयत्नाने म्हणजे दोन वर्षे ११ महिने १८ दिवसाच्या कालावधीनंतर एक सर्वसमावेशक अशा प्रकारचे जगातील सर्वात मोठे असे लिखित स्वरूपातील भारताच्या सर्वोच्च कायद्याचे पुस्तक ज्याला भारताचे संविधान, भारतीय राज्यघटना असे संबोधले जाते ज्याद्वारे मुलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती,अधिकार, आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो . या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना देशाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यासोबतच सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य व समानता सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवते , बंधुत्वाची हमी देते व राष्ट्रीय एकात्मता अधोरेखित करते म्हणूनच मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या सन्मानार्थ व संविधानातील मुलभूत तरतूदीविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.हे लक्षात घेऊन आजरोजी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय हन्नूर येथे ” संविधान दिवस ” साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रास्ताविक फलकाचे पुजन करण्यात आले. यानंतर इ. १० वी ची विद्यार्थिनी कु. लक्ष्मी हलकंबे हिच्या समवेत सर्व विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले. यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. शहाजी माने यांनी “संविधान दिन व महत्व ” याविषयी मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सौ. स्वप्नाली जमदाडे मॅडम यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अप्पासाहेब काळे,शशी अंकलगे, सुरेश जाधव, अब्दुल अझीझ मुल्ला,सरदार मत्तेखाने, प्रा. रविंद्र कालीबत्ते, काशीनाथ पाटील, रमेश शिंदे, राजेंद्र यंदे,शिक्षिका सौ. मृदुलादेवी स्वामी, मल्लम्मा चप्पळगाव, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष व पुर्ननिर्वाचित आमदार मा. सचिनदादा कल्याणशेट्टी, संस्थेचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक आदरणीय श्री.मल्लिनाथ कल्याणशेट्टी, प्रशालेचे माजी प्राचार्य व आधारस्तंभ सन्माननीय श्री. सिध्देश्वर कल्याणशेट्टी, संचालिका सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी, हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते मा. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी, संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुती, सी. ई. ओ. सौ. रुपाली शहा, विज्ञान विभाग प्रमुख सौ. पुनम कोकळगी यांनी प्रशालेतील या कार्यक्रमाचे कौतुक केले.