mh 13 news network
आता सर्व कलावंतांना लागले वेध राज्य नाट्यस्पर्धेचे महाराष्ट्रात उद्यापासून 63 वी राज्यनाट्य स्पर्धा फार जोशात चालू होत आहे.
या स्पर्धा सोलापुरात दिनांक 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत हुतात्मा स्मृती मंदिर येथे रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कलावंत यासाठी गेले दोन-तीन महिने खूप परिश्रम करत असतात. आणि ताकतीने स्पर्धेत उतरत असतात या स्पर्धकांना आपण रसिकांनी निश्चित प्रोत्साहन दिले पाहिजे.
त्यामुळे या सर्व नाटकांसाठी आपण वेळात वेळ काढून नाटकाला येणे हे आवश्यक आहे. जेणेकरून सोलापुरातून अजून अनेक कलावंत हे महाराष्ट्रामध्ये आपलं नाव रोशन करतील.
आज सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे राज्य नाट्यस्पर्धेचे समन्वयक श्रीमान अमोलजी धाबळे यांनी सर्व तयारी पूर्ण केली.
कोणत्याही कलावंतांना नाट्यसंस्थेला अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी समन्वयक म्हणून अमोलजी धाबळे घेत असतात.
आपणाला ही ही सर्व नाटके पाहताना खूप आनंद होईल त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी या नाटकांचा आस्वाद घ्यावा असे वाटते.
या स्पर्धेचे उद्घाटन 25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सात वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे त्यामुळे आपण कलावंत,रसिक या सर्वांनी या उद्घाटन समारंभास ही उपस्थित रहावे.