महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते इंद्रभवन परिसरात रोपवाटिकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन…
उद्या होणाऱ्या वसुंधरा संमेलनात शहरातील पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवहान महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पहिल्या वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने गुरुवारी वृक्ष दिंडी काढण्यात आली. यात हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. महापालिका परिसरात रोपवाटिकांचे प्रदर्शनही भरवण्यात आले.चार हुतात्मा पुतळा परिसरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षी यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी झाडे वाचवा.. झाडे जगवा.. यासह पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धरामेश्वर मंदिर, ज्ञान प्रबोधिनी चौक मार्गे महापालिका परिसरात वृक्षदिंडीचा समारोपप्रसंगी महापालिका इंद्र भवन परिसरात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने पथनाट्य सादर केले या वृक्ष दिंडीस सोलापूर शहरातील खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते रोपवाटिकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या रोपवाटिकांच्या प्रदर्शनामध्ये तुळस, सब्जा, कापूर तुळस, वैजयंती, मारवा यासह इतर आयुर्वेदिक रोपे पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापाल रूपाली कोळी,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे, पर्यावरण विभागाचे अधिकारी अक्षय मोरे, स्वप्नील सोलनकर, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांच्यासह पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उद्या हुतात्मा स्मृती मंदिरात
दिवसभर व्याख्याने आणि मार्गदर्शन
शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळी वसुंधरा संमेलन होणार आहे. पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर पर्यावरण संवर्धन या अनुषंगाने सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल विविध संस्थांचा गौरव ही यावेळी करण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या वसुंधरा संमेलनात सोलापूर शहरातील पर्यावरण प्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली.