MH 13 NEWS NETWORK
सांघिक स्पर्धेत मुलात व मुलीत वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी विजेते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेलाटी व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन निवड बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात वालचंद अभियांत्रिकीची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धी उपासे हिने सहापैकी सहा गुण प्राप्त करत अव्वल स्थान पटकाविले व मुलांच्या गटात वालचंद अभियांत्रिकीच्याच आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त रजत आडम याने ६.५ गुणांसह विजेतेपद मिळविले. तसेच सांघिक स्पर्धेत मुलात वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजीने स्पर्धेत वर्चस्व
राखत मुले व मुलीत विजेतेपद पटकाविले.
आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या समारोपाप्रसंगी ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर प्रा राहुल माने, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. जी. कुलकर्णी, क्रीडा संचालक गोकुळ यादव, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच सुमुख गायकवाड, आंतरविद्यापीठ स्पर्धेचे सचिव नागनाथ पुदे, क्रीडा संचालक अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, युवराज पोगुल, विजय पंगुडवाले यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले. यावेळी बुद्धिबळ स्पर्धेमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना व विजेत्या संघांना ट्रॉफी बुके फळांचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. केदारनाथ काळवणे क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे खेळाडू आपल्या विद्यापीठातून तयार व्हावेत असे सांगून बुध्दीसह निरोगी तंदुरुस्त शरीर ही काळाची गरज आहे असे सांगितले. प्राचार्य एस. जी. कुलकर्णी यांनी बुद्धिबळ हा बुद्धीला चालना देणारा खेळ असून खेळाडूंना विभागीय विद्यापीठ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदर आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत विविध महाविद्यालयातील १३० खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून प्रेक्षणीय लढती पहावयास मिळाल्या. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री दिलीप माने, संस्थेचे उपाध्यक्ष श्री पृथ्वीराज माने, संस्थेच्या सचिवा सौ जयश्रीताई माने, विश्वस्त स्नेहल माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आंतर महाविद्यालयीन निवड बुद्धिबळ स्पर्धा
अंतिम निकाल (अनुक्रमे १ ते ६, गुण व बोकोल्स गुणांसह) – मुले:
१) रजत आडम – ७, वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, सोलापूर
२) तेजस दौंडे – ६ (३०), सांगोला कॉलेज, सांगोला
३) पल्लव चौधरी – ६ (२८), वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, सोलापूर
४) पृथ्वीराज वाघमोडे – ६ (२७.५),डी. एस. गरड कॉलेज, मोहोळ
५) प्रज्वल कोरे – ५.५ (३३.५),हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर
६) अभिजीत गोरे – ५.५ (३१..५),छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, सोलापूर
मुली: १) रिद्धी उपासे – ६, वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, सोलापूर
२) वृंदाक्षी बुरांडे – ५ (२२), उमा महाविद्यालय, पंढरपूर
३) नेहा झिरपे – ५(१८.५), स्वेरी,पंढरपूर
४) प्रिती धुळे – ५(१८),हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर
५) मयूरी कोरे – ४.५, एस. बी. पाटील महाविद्यालय, मंद्रुप
६) तृप्ती शिंदे – ४(२२.५),श्री. संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढा
सांघिक बुद्धिबळ स्पर्धा – अंतिम निकाल (मुले)
१) वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, सोलापूर (८ गुण)
२) संगमेश्वर कॉलेज, सोलापूर (५-३०.५)
३) बी.एम.आय.टी. कॉलेज, बेलाटी (५-२६)
मुली: १) वालचंद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी, सोलापूर (५, ८ गुण)
२) हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर (५, ५ गुण)
३) स्वेरी, पंढरपूर (४)