MH 13News Network
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शिक्षणासंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी जाहीर केली आहे.येत्या जून २०२४ पासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे,
त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची
घोषणा त्यांनी एका कार्यक्रमात केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये राज्यातील मुलींच्या उच्च शिक्षणाची द्वारे सहजपणे खुली होणार आहेत.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे. अशा मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार असल्याची घोषणा केली.
पाटील यांनी केलेल्या घोषणेत ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. मेडिकलसाठी तर करोड रुपये लागतात.
यामुळे सर्वसामान्य घरातील मुले शिकू शकत नव्हती. त्यांच्यासाठी मोठा आधार राज्य सरकारने निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी पसरली आहे.कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांना या मुलांनी अडवत फक्त मुलींनाच मोफत का ?,
या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत करावे अशी मागणी केली.यावेळी पाटील यांनी तुमची ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन असे आश्वासन दिले.