MH13NEWS network
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर शहरातून रे-नगर कुंभारी येथील घरकुल वसाहतीकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आणि यंत्रमाग व बिडी कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
सोलापूर परिवहन विभागाच्या वतीने दिनांक ८ मे २०२५ पासून नव्या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे.मार्ग क्रमांक १६ अंतर्गत ही बससेवा रेल्वे स्टेशन ते रे-नगर घरकुल वसाहत कुंभारी या मार्गावर धावणार असून दररोज दोन वेळा सेवा उपलब्ध राहणार आहे.

सकाळी ८:०० वाजता रेल्वे स्टेशन येथून सुटणारी बस ९:१५ वाजता रे-नगरला पोहोचेल. तर संध्याकाळी ५:३० वाजता सुटणारी दुसरी बस ६:४५ वाजता रे-नगरला पोहोचणार आहे.
ही बस सेवा छत्रपती शिवाजी महाराज चौक, कन्ना चौक, पाणी टाकी, सुतमिल, मल्लिकार्जुन नगर, गोदूताई फाटा आणि कुंभारी गाव या भागांमधून जात आहे.
या मार्गावर अनेक कामगारवस्ती असल्याने, या सेवेचा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना फायदा होणार आहे.तिकीट दर देखील वाजवी ठेवण्यात आले आहेत.
रेल्वे स्टेशन ते रे-नगर प्रवासासाठी ₹३०, तर इतर थांब्यांनुसार ₹१५ ते ₹२५ पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत.परिवहन विभागाने नागरिकांनी व कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळची फेरी:

सुटण्याची वेळ : सकाळी ०८:०० वाजता – रेल्वे स्टेशन येथून पोहोचण्याची वेळ : सकाळी ०९:१५ वाजता – रे-नगर घरकुल वसाहत
सायंकाळची फेरी:
सुटण्याची वेळ : सायंकाळी ०५:३० वाजता – रेल्वे स्टेशन येथूनपोहोचण्याची वेळ : सायंकाळी ०६:४५ वाजता – रे-नगर घरकुल वसाहत
तिकीट दर (एकेरी)
:रेल्वे स्टेशन ते रे-नगर : ₹३०/-
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रे-नगर : ₹२५/-
कन्ना चौक ते रे-नगर : ₹२०/-
पाणी टाकी ते रे-नगर : ₹२०/
-मल्लिकार्जुन नगर ते रे-नगर : ₹२०/
-कुंभारी गाव ते रे-नगर : ₹१५/-