Mh13news network
सोलापूर, (प्रतिनिधी):
शिवमुद्रा प्रतिष्ठान संचलित शूरछावा छ. संभाजी महाराज जन्मोत्सव महामंडळ, बाळे – सोलापूर यांच्या वतीने, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूरमध्ये तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअस असतानाही, एकूण १०६ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.या शिबिराला शिवशंभू भक्तांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागातून प्रेरणा घेत, सर्व रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. महामंडळाच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, यासंदर्भात संकेत क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकेत क्षीरसागर, गणेश कांबळे, कुलभूषण पाटील, गजेंद्र हातागळे, सोनू कांबळे, विकास सुरवसे, अनिकेत बडूरे, तुषार जाधव, सौरभ माने, सतीश पुजारी, विनायक हातागळे, आशिष प्रधाने, अजय सोनवणे, सोहम सुरवसे, दिनेश माने, सुरज धाकपाडे, पृथ्वीराज माने, ऋषी चराटे, सुमित उराडे, ऋषिकेश पिंगळे, अमर साळुंके, गुरु चराटे, लखन सालगुडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या शिबिराच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा जागर होत असून, समाजात सामाजिक सेवा आणि राष्ट्रप्रेमाचे बीज पेरले जात आहे.