Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
26
VIEWS
ShareShareShare

सोलापूर (प्रतिनिधी ) : शेकडो वर्षानंतर आयोध्या मध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे. हे आपणा सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या ‘धागा विणूया श्रीरामासाठी’ या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी, वालचंद शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. रणजीत गांधी, आमदार सुभाष देशमुख, उद्योजक व केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. शोभाताई शहा, तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा उपक्रम 5 ते 14 जानेवारी दरम्यान वालचंद महाविद्यालय समोरील श्री पंचमुखी हनुमान मंदिर येथे चालणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार असून सर्व सोलापूरकरांनी यात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात आले.



सोलापुरातून हाताने विणले जाणारे वस्त्र प्रभू रामचंद्राला अर्पण होणार आहेत. या उपक्रमात तयार झालेले वस्त्र प्रभू श्री रामांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सदर उपक्रमास अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोशाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देव गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी धवल भाई शहा, रंगनाथ बंकापुरे, अंबादास नक्का, ज्ञानेश्वर म्याकल, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त राजमहिंद्र कमटम, सत्यनारायण गुर्रम, विवेकानंद केंद्राचे सर्व कार्यकर्ते, महाविद्यालय तरुण तरुणी, यंत्रमाग कामगार आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: BJP MaharashtraShriram
Previous Post

MH 13 NEWS चे संपादक,पत्रकार महेश हणमे यांना मातृशोक

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर OBC सेलच्या अध्यक्षपदी अनिल छञबंद

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर OBC सेलच्या अध्यक्षपदी अनिल छञबंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.