उर्मिला सौदागर हणमे (वय वर्षे 69 ) राहणार- राजेश्वरी नगर,बाळे यांचा रविवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने मृत्यू झाला.त्यांच्यावर मार्कंडेय रुग्णालयात उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्या आध्यात्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.मोहोळ तालुक्यातील हिंगणी गावात त्यांचे बालपण गेले होते.गृह उद्योग सुरू करून त्यांनी मुलांचे पूर्ण शिक्षण केलं.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, चार नातवंडे असा परिवार आहे.
पत्रकार महेश हणमे यांच्या त्या मातोश्री होत.