MH 13news Network
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर OBC सेलच्या अध्यक्षपदी अनिल छञबंद यांची निवड करण्यात आली असून उपमुख्यमंञी अजित पवार यांनी त्यांचा सत्कार करुन नियुक्तीपञ प्रदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सोलापूर शहराची कार्यकारीणी नुकतीच जाहीर केली. विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पञ प्रदान केले आहे.यामध्ये सोलापूर OBC सेलच्या अध्यक्षपदी अनिल छञबंद यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबतचे नियुक्ती पञ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी नूतन OBC सेल अध्यक्ष अनिल छञबंद यांच्याकङे सुपुर्द करत छञबंद यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा व आशिर्वाद दिले आहेत.या निवङ प्रक्रियेबाबत सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान व सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांना छञबंद यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.