Sunday, June 22, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

इतिहास साजरा होणार अधिक नियोजनबद्ध पद्धतीने – शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी

mh13news.com by mh13news.com
17 May 2025
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
इतिहास साजरा होणार अधिक नियोजनबद्ध पद्धतीने – शिवराज्याभिषेकाची जय्यत तयारी
0
SHARES
14
VIEWS
ShareShareShare

रोहयो मंत्री भरत गोगावले

MH 13 NEWS NETWORK

रायगड -रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या.

महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ.  त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे.

शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा, मंडप, खानपान, राजशिष्टाचार, परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

Previous Post

९३५ कोटींचा निधी वेळेत खर्च करा – सर्व यंत्रणांना प्रशासनाचा आदेश

Next Post

सोलापुरात भीषण आग; MIDCतील कारखान्यात ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू..

Related Posts

Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम
शैक्षणिक

Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम

20 June 2025
वाढदिवसानिमित्त शाळेला स्पिकर सेट; तुषार साठे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
राजकीय

वाढदिवसानिमित्त शाळेला स्पिकर सेट; तुषार साठे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

20 June 2025
Solapur |वडाळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा
शैक्षणिक

Solapur |वडाळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा

20 June 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचं निधन
धार्मिक

श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचं निधन

20 June 2025
ब्रेकिंग | कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या; युवक व युवतीने घेतला ओढणीनं गळफास..
सामाजिक

ब्रेकिंग | कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या; युवक व युवतीने घेतला ओढणीनं गळफास..

19 June 2025
डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..
शैक्षणिक

डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..

18 June 2025
Next Post
सोलापुरात भीषण आग; MIDCतील कारखान्यात ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू..

सोलापुरात भीषण आग; MIDCतील कारखान्यात ३ कामगारांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू..

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.