MH 13News Network
आज अंतरवाली सराटी मध्ये मंत्री शंभूराज देसाई, आमदार राजेंद्र राऊत, संदिपान भुमरे, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. उपोषण सोडण्यासाठी त्यांनी त्यांची समजूत घातली. यावर मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या त्यांनी लिहून घेतल्या. तसेच उद्या ताबडतोब बैठक लावण्याचे आश्वासन दिले .त्यानंतर जरांगे पाटलांकडून सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात आला मात्र मागण्या मान्य न झाल्यास राजकारणात उतरणार असल्याचे सांगितले आणि सगळे उमेदवार पाडू असा गंभीर इशारा दिला. आणि मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण स्थगित केले.
सरकारला एक महिन्याचा वेळ मागण्या मान्य करण्यासाठी दिलेल्या असून 13 जुलै ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.


दरम्यान, महिनाभरात मागण्या मान्य झालं नसल्यास राजकारणात उतरणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणावर मराठा मतांचा फटका बसला होता.