MH 13News Network
दरवर्षी प्रमाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नवी पेठ या बाजारपेठेमध्ये शिवसंदेश ग्रुप व राष्ट्रीय छावा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भव्य असा नेत्रदीपक देखावा सादर करण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय छावा संघटना व शिवसंदेश ग्रुपच्या वतीने शिवजयंतीनिमित्त नवी पेठ, सोलापूर येथे भव्य देखावा करण्यात आला आहे. या देखाव्याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे.


राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश (दत्ता) पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि येथील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंती मिरवणुकीवर खर्च न करता गरजू विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी शिवसंदेश ग्रुप व राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून मदत केली जाते.