Tuesday, November 18, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

येरवडा कारागृहात ‘द्वितीय चेस फॉर फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र
0
येरवडा कारागृहात ‘द्वितीय चेस फॉर फ्रीडम’ या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

परिषदेचे १९ ते २१ जून दरम्यान आयोजन

मुंबई : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (FIDE) व इंडियन ऑईल यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 19 ते 21 जून 2024 या कालावधीत करण्यात आलेले आहे.

विविध देशांतील कारागृहांत बंदीस्थ असलेल्या बंदीवानांना बुद्धिबळ (Chess) या खेळामध्ये प्रशिक्षण देऊन विविध देशांतील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे व तुरूंगातून सुटका झाल्यानंतर समाजामध्ये गेल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा काही कौशल्ये आहेत, ज्याआधारे आपण समाजामध्ये आत्मसन्मानाने जगू शकू, असा आत्मविश्वास बंदिवानांमध्ये निर्माण करणे हा या परिषदेच्या आयोजनाचा मुख्य हेतू आहे.

परिवर्तन प्रिझन टू प्राईड नई दिशा या उपक्रमांतर्गत येरवडा कारागृहाच्या बंदीवानांच्या संघाने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. या स्पर्धा प्रत्येक वर्षी नवीन देशांत आयोजित करण्यात येणार आहेत.

या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता म्हणाले, येरवडा कारागृहातील बंद्यांच्या संघाने सुवर्णपदक मिळविले आहे, ही बाब निश्च‍ित आनंदाची आहे. त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे कारागृहातील बंदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पुढे येत आहेत. याचा आवाका निश्च‍ित वाढविण्यात येईल. येथून पुढे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कारागृहातून बुद्धिबळ खेळणारे संघ तयार करण्यात येतील. तसेच जास्तीत जास्त महिला बंदीवानांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येईल. सुवर्णपदक प्राप्त बंदीवानांना शिक्षेत विशेष माफी देऊन प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. बंदीवान हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत आहेत. मागच्या वर्षी एक प्रयत्न म्हणून आम्ही बंदीवानांसाठी बुद्धिबळ खेळास सुरूवात केली होती आणि आता एका वर्षातच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन येरवडा कारागृहात करण्यात आलेले आहे. सुरूवातीला बंदीवानांना बुद्धिबळाबाबत काहीच माहिती नव्हते. पण त्यांचा रोज चार ते पाच तास तयारी करून मागच्या वर्षी सुवर्णपदक मिळविलेले आहे. बाहेर सर्व सुविधा असणाऱ्या खेळाडूंना जे जमणार नाही ते आमच्या कारागृहातील बंदीवान खेळाडुंनी करून दाखविले. सध्या येरवडा कारागृहात महिला व पुरूष असे 200 बंदी बुध्दीबळ शिकत आहेत.

यावेळी इंडियन ऑईलच्या डायरेक्टर (HR) श्रीमती रश्मी गोविल म्हणाल्या, बुद्धिबळामुळे मनाला चालना मिळते व समोर आलेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे कौशल्य निर्माण होते.

या प्रसंगी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ, इंडियन ऑईलच्या संचालक (मानव संसाधन) रश्मी गोविल, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेच्या सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वोगेटलिन, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग व फाईड प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्रातील वाढवण येथे ७६,२०० कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट

Next Post

हिंजवडी परिसरात उद्योगसुलभ वातावरणासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी

Related Posts

लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र

लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५

18 November 2025
बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी केंद्राकडून बिबट नसबंदीला मंजुरी
मनोरंजन

बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी केंद्राकडून बिबट नसबंदीला मंजुरी

18 November 2025
वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते  उद्घाटन
महाराष्ट्र

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

18 November 2025
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा
आरोग्य

पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा

18 November 2025
पत्रकारांनी दाखवला मानवतेचा मार्ग — वांगी शाळेत पाझरला पाण्याचा झरा
महाराष्ट्र

पत्रकारांनी दाखवला मानवतेचा मार्ग — वांगी शाळेत पाझरला पाण्याचा झरा

18 November 2025
शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव – पालक मंत्री जयकुमार रावल
महाराष्ट्र

शिल्पकार राम सुतार यांच्या प्रतिभासंपन्न कला कर्तृत्वाचा गौरव – पालक मंत्री जयकुमार रावल

15 November 2025
Next Post
हिंजवडी परिसरात उद्योगसुलभ वातावरणासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी

हिंजवडी परिसरात उद्योगसुलभ वातावरणासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती द्यावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.