उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
सोलापूर | १७ जून २०२५:
राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आपला करिष्मा दाखवणारे उमेश पाटील यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या मनगटाला घड्याळाची साथ मिळाल्याची चर्चा मोहोळ तालुक्यात होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्री. उमेश पाटील यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलेल्या अधिकृत नियुक्ती पत्रानुसार, पक्षाचे उद्दिष्ट धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाटील यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल श्री. पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
नवीन जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना उमेश पाटील यांनी पक्षाच्या कार्यासाठी अखंडपणे कार्यरत राहण्याची ग्वाही दिली आहे.
श्री उमेश पाटील (M.SC.Agri.)
आत्तपर्यंतच्या राजकीय कारिर्दीत पक्षाने विविध पदांच्या माध्यमातून दिलेल्या जबाबदाऱ्या
मुख्य प्रवक्ता : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश ( 2012 ते आतापर्यंत)
माजी प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी युवक काँग्रेस (2012-2015)
मा.जिल्हाध्यक्ष : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(2019-2023)
जिल्हा परिषद सदस्य,सोलापूर जिल्हा (7500 मताधिक्य) (2017-2022)
नियोजन समिती सदस्य सोलापूर (2017-2022) (निवडणूक लढवून)प्रदेश सरचिटणीस ( 2008 पासून युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा 3 वर्षाचा कार्यकाळ वगळता 2019 पर्यंत सातत्याने पक्षाच्या वरिष्ठ कार्यकारिणी मध्ये सरचिटणीस पदावर)
जिल्हा प्रभारी : नंदुरबार ( 2014 ते 2017)निवडणूक निरीक्षक : लातूर मनपा (2011)
केज विधानसभा पोटनवडणुक( 2012 – पृथ्वीराज साठे)
मावळ लोकसभा(2019-पार्थ पवार)
राष्ट्रीय सरचिटणीस – राष्ट्रवादी यवक काँग्रेस (2009-2011)
प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य (स्वतःची नोंदणीकृत कामगार संघटना)