सोलापुरातील पत्रकार अभिजीत वडगावकर यांचे आज सोमवारी सायंकाळी आकस्मित निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. वयाच्या 50 व्यां वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शहरातील होटगी रोडवरील एका रुग्णालयात अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. आज सोमवारी त्यांची प्राणज्योत मालावली.

उत्तर कसबा येथील महालक्ष्मी दूध डेअरी जवळील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी ,मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
उद्या मंगळवारी सकाळी सात वाजता पुणे नाका येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
त्यांचा मित्रपरिवार मोठा होता, तसेच ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने परिसरात प्रचंड हळहळ होत आहे.