MH 13 News Network
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे, कार्याध्यक्षपदी पंकज काटकर, तर सचिवपदी महेश हणमे
सोलापुरातील शिवजन्मोत्सव सोहळा वेगळ्या उंचीवर पोहोचवणार, – नूतन उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे*सोलापूर : शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी आणि शिवभक्तांची बैठक शिंदे चौक येथील डाळींबी आड मैदान येथे पार पडली, यावेळी मावळत्या अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली, यावेळी राजन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी, कशाप्रकारे शिवजयंती साजरी करावी याबाबत बैठकीत सूचना मांडल्या तदनंतर मागील वर्षा मधील जमा खर्चाचा हिशोब मांडण्यात आला, त्यानंतर सर्वांच्या सूचनेनुसार नूतन उत्सव पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.

यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ 2025 – 26 सालासाठी नूतन उत्सव अध्यक्ष म्हणून सी ए सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्ष पदी पंकज काटकर तर सेक्रेटरीपदी महेश हणमे यांची निवड करण्यात आली पुढील पदाधिकारी खालीलप्रमाणे – उपाध्यक्ष – सोमनाथ शिंदे, अमोल कळंब, जॉन मुनाळे, लता ढेरे, सुनंदा साळुंखे, सहसेक्रेटरी – विश्वनाथ गायकवाड, खजिनदार – मारुती सावंत, सहखजिनदार – विवेक इंगळे, मिरवणूक प्रमुख – आदित्य घाडगे, उपमिरवणूक प्रमुख – सोमनाथ म्हस्के, कुस्ती प्रमुख – बापू जाधव, प्रसिद्धी प्रमुख – संदीप वाडेकर, बसू कोळी, कार्यालयीन प्रमुख – देविदास घुले, सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली.

यावेळी मावळत्या अध्यक्षांसह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आला, नूतन अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात करण्यात येणार असून यावर्षी शिवजयंतीचा सोहळा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प सुशील बंदपट्टे आणि नूतन पदाधिकाऱ्यांनी केला तर उपाध्यक्ष सुनंदा साळुंखे यांनी शिवजन्मोत्सव निमित्त होणाऱ्या पाळणा कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवाजीराव घाडगे गुरुजी, ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, ट्रस्टी सेक्रेटरी प्रीतम परदेशी, ट्रस्टी खजिनदार अंबादास शेळके, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे, ट्रस्टी सदस्य राजन जाधव, विनोद भोसले, अनिकेत पिसे, बजरंग जाधव, भाऊसाहेब रोडगे, महादेव गवळी, विवेक फुटाणे, प्रकाश ननवरे, राजाभाऊ काकडे, राजू हुंडेकरी, लहू गायकवाड, प्रतापसिंह चौहान, सुनील शेळके, मतीन बागवान, विजय पुकाळे, जितू वाडेकर, संजय पारवे, उज्वल दीक्षित, लताताई फुटाणे, निर्मला शेळके, शत्रुघन माने, अनिल म्हस्के, संदीप साळुंके, सचिन चव्हाण, ब्रह्मदेव पवार, जीवन यादव, सदाशिव पवार, संजय जाधव, कल्याण गव्हाणे, लिंबाजी जाधव, धनाजी भोसले, कुमार क्षीरसागर, दत्ता जाधव, प्रदीप कळंब, अंबादास सपकाळ, लक्ष्मण महाडिक, गोवर्धन गुंड, मोहन खमीतकार, मनीषा नलावडे, प्राजक्ता बागल, अमोल व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.