MH 13 News Network
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या शहर उत्तर मध्ये बाळे भागातील राजेश्वरी नगर हे गेल्या दहा वर्षापासून सुविधा पासून वंचित आहे. रस्ता, पाईपलाईन, स्वच्छता नसल्याने नागरिक प्रामुख्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज आहे.
बाळे भागातील राजेश्वरी नगर भागात गेल्या दहा वर्षापासून रस्त्याचे काम करण्यात आले नाही. अजूनही चिखल- माती मधून नागरिकांना आणि वाहनधारकांना वाट शोधावी लागते.
या चिखलात घसरून अनेक वेळा येथील नागरिक आणि वाहनधारक पडलेले आहेत. या संदर्भात माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे नागरिकांनी पाठपुरावा केला असता त्यांनी पाईपलाईनसाठी निधी मंजूर केला. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या ठिकाणचे उद्घाटन झाले असून बोर्ड सुद्धा लागला परंतु अद्यापही पाईपलाईनचे काम केले जात नाही त्यामुळे रस्ता सुद्धा केला जात नाही.
यंदाच्या पावसाळ्यात या नगरमध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्यामुळे वाहनधारक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर नाराज झाले असून यासंदर्भात महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.
मागील दहा वर्षात एकदाही रस्ता केला नसल्यामुळे जेव्हा पावसामुळे लोक घसरून पडायचे तेव्हा महापालिकेच्या वतीने थोडा मुरूम टाकण्यात येतो परत जैसे थे अशी परिस्थिती राहते.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता या ठिकाणी अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी करतो असे आश्वासन त्यांनी स्थानिक नागरिकांना दिले होते. त्यानंतर सुद्धा अधिकारी वर्ग या ठिकाणी फिरकला नाही.